मूळ उद्दिष्ट : बॉयलर अटेंडंट कामगारांचा सर्वांगीण विकास करणे
महाराष्ट्रातील प्रत्येक बॉयलर अटेंडंटचा आवाज
बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना ही महाराष्ट्रातील सर्व बॉयलर अटेंडंट कामगारांची एकमेव संघटना आहे. आमचा मुख्य ध्येय आहे - प्रत्येक बॉयलर अटेंडंट कामगाराचा सर्वांगीण विकास करणे.
आम्ही कामगारांना प्रशिक्षण, परीक्षा तयारी, कायद्याचे हक्क, आर्थिक सुरक्षा आणि कुटुंबाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहोत. आमच्या संघटनेत सामील होऊन तुम्हीही आपल्या हक्कांसाठी लढा द्या.
प्रशिक्षण
हक्क
कुटुंब कल्याण
बॉयलर अटेंडंट कामगारांचा सर्वांगीण विकास हा आमचा मूलमंत्र
चर्चासत्राच्या माध्यमातून सर्व अटेंडंटला बॉयलर विषयी माहिती पुरविणे.
शक्य असेल तेव्हा कार्यशाळा आयोजित करणे.
ते कुशल कामगार/इंजिनियर कसे बनतील यासाठी प्रयत्न करणे. (छोट्या छोट्या कोर्सेसची माहिती पुरविणे, वेगवेगळ्या फॅक्टरीच्या भेटी आयोजित करणे, विषय संबंधी असलेले साहित्य आणि पुस्तकांची माहिती देणे इत्यादी.)
परीक्षा होण्याचा अंदाज/नक्की तारखा बॉयलर डिपार्टमेंट कडून मिळवून सर्वांना कळवीत राहणे. त्यामुळे डिपार्टमेंटवरील, ही माहिती पुरविण्याचा भार कमी होईल.
परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक ती मदत पुरविणे.
तज्ञा कडून फॉर्म पडताळून घेणे. यामुळे फॉर्म बाद होण्याची शक्यता कमी होईल.
अटेंडंटच्या रास्त अडचणी डिपार्टमेंटच्या नजरेस आणून देणे व नियमानुसार शक्य असल्यास तोडगा काढणे.
नवीन जागा निघाल्यास ती माहिती सर्वांना कळविणे.
अटेंडंट फंड उभा करून मेडिकल इमर्जंसी साठी गरजू सभासदांना मदत करणे.
सर्व बॉयलर अटेंडंट बंधू हे आपलेच आहेत त्यात कोणत्याच प्रकारचा भेदभाव संघटनेकडून न करणे आणि बाहेरील कोणत्याच व्यक्ती कडून केला जाणार नाही याची काळजी घेणे.
बॉयलर अटेंडंट बंधूकडे असलेले प्रमाणपत्र किती मोलाचे आहे हे सर्वांना समजावणे व त्या नुसार योग्य तो पगार आपल्या बंधूंना मिळवून देण्यचा प्रयत्न करणे.
PF, Gratuity आणि ESIC सारख्या महत्वाच्या सुविधा प्रत्येक बॉयलर अटेंडंट बंधूंना मिळवून देणे.
बॉयलर अटेंडंट च्या कंपनी मधील अपघाती निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्याच्या मुलाला किंवा त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती ला कामावर रुजू करण्याचे प्रयत्न करणे. तसेच अपघात नंतर लागणारा उपचार खर्च पूर्ण कंपनीनेच करावा यासाठी आग्रही राहणे.
बॉयलर अटेंडंट बंधूंच्या मेरीट मध्ये येणाऱ्या मुलाना कामगार निधीतून शिष्यवृत्ती देऊन आणि किंवा शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
बॉयलर अटेंडंट नियुक्ती गुणवत्ता बघूनच करण्यात यावी. संघटना प्रत्येक बॉयलर अटेंडंट ला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
महाराष्ट्रातील प्रत्येक बॉयलर अटेंडंट हा कंपनी रोलवर कायमस्वरूपी कामावर रुजू करावे यासाठी प्रयत्नशील राहणे. तसेच भविष्यातील महाराष्ट्रातील कोणताच बॉयलर अटेंडंट हा बेरोजगार राहणार नाही त्यातही नियोजन करणे.
ही सर्व ध्येय धोरणे पूर्ण होण्यासाठी सर्व बॉयलर अटेंडंटची, कुटुंब app मध्ये सभासद नोंदणी करून संघटनेची ताकत वाढवणे.
संघटनेत सामील झालेल्या सदस्यांवर कुठल्याही प्रकारची सदस्य फी किंवा आर्थिक भार पडू न देणे.
फॉर्म भरणे, तपासणी, तारखा, चर्चासत्रे
मेडिकल इमर्जन्सी, शिष्यवृत्ती, PF-ESIC सुविधा
कायमस्वरूपी नियुक्ती, योग्य पगार, अपघात संरक्षण
कोणतीही सदस्य फी नाही • कुटुंबासहित नोंदणी
Point १७ नुसार - कुटुंब app मध्ये सभासद नोंदणी करा आणि संघटनेची ताकत वाढवा!
आमच्या कामगारांचे काम, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि यशाचे क्षण
महीने अनुसार कैलेंडर फोटो
आमच्या संघटनेशी संपर्क साधण्यासाठी खालील माहिती वापरा: